काय आपण आपल्या लहान मुलांच्या दातांची योग्य ती काळजी आहात का?
आपण जसे स्वतःच्या दातांची योग्य काळजी घेतो , जसे दोन वेळा दात घासणे , चुळा भरणे वगैरे , तसेच आपण आपल्या मुलांच्या दात घासण्याच्या सवयीवर योग्य तेवढे लक्ष देतो का ? अगदी लहान मुले कधीकधी टूथपेस्ट खातात किंवा गिळून टाकतात , कारण ती गोड लागते , सर्व दातांवरून ब्रश फिरवत नाहीत , ब्रश एक मिनिट सुद्धा करत नाहीत, किंवा एक मिनिटाच्या आत संपवतात , ब्रश करायला कंटाळा करतात , व्यवस्थितरित्या दात घासत नाहीत इत्यादी.
आहारामध्ये बरेचदा व वारंवार चॉकलेट, केक , बिस्कीट , पेस्ट्री , इत्यादी असते . गोड खाण्याचे प्रमाण जास्त असते, अशामुळे दात किडणे वाढते, कीड वाढून असह्य अशा वेदना होणे, हे प्रकार घडतात.
सत्तर टक्के मुलांमध्ये दात कमकुवत किंवा किडलेल्या आढळतात मात्र केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच पालक आपल्या लहान मुलांच्या दातांची योग्य ती काळजी घेतात .
बऱ्याचदा पालकांचे म्हणणे असते की दुधाचे दात आहेत पडणार आहेत , किडले तरी काय फरक पडतो ? आमचं बाळ कोणतीही ट्रीटमेंट सुद्धा करून देणार नाही ? अशामुळे कीड वाढत जाते व आहार व्यवस्थित रित्या खाण्यास अडथळा येतो .
योग्य ते न्यूट्रिशन लहान वयात न मिळाल्यामुळे पुढे जाऊन वेगवेगळ्या आजारांना सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. म्हणूनच पालकांनी मुलांच्या आरोग्यासाठी , त्यांच्या खाण्यापिण्यात बरोबरच त्यांच्या सवयी आणि प्रामुख्याने त्यांच्या दातांची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.
यासाठी लहानपणापासूनच दातांना चिकटणारे पदार्थ खाणे टाळावे , अतिशय गोड पदार्थ खाऊ नये , जेवणानंतर खळखळून चूळ भरण्याची सवय लावावी , दिवसातून किमान दोनदा दात घासण्याची सवय करावी , वर्षातून एकदा तरी डेंटिस्टकडे दातांची तपासणी करावी , भरपूर पाणी प्यावे , लहान मुलांनी चहा पिऊ नये , अतिशय थंड पदार्थ जसे की बर्फ वगैरे दातांनी तोडू नये किंवा चावून खाऊ नये.
लहान मुलांमध्ये दोन प्रकारची कीड असते, एक म्हणजे नरसिंग व दुसरी असते रामपॅन्ट.
टूथपेस्ट कोणता वापरतो याहीपेक्षा महत्त्वाचे आहे की तो कसा व कोणत्या दिशेने तोंडामध्ये फिरवला जातो. लहान मुलांनी गोल गोल व वर खाली असे प्रत्येक दातावरून किमान दोन ते तीन मिनिटे व्यवस्थित ब्रश करावा . दात घासण्यासाठी शक्यतो लहान मुलांसाठी असलेल्या टूथपेस्ट चा वापर करावा.
आहारामध्ये भरपूर हिरव्या पालेभाज्या , दूध, दही , सर्वसमावेशक आहार , वरण-भात चपाती भाजी , इत्यादी दररोज असावा, जेवण नीट व पोट भरून व्यवस्थित केल्यास दिवसभर इतर बारीक-सारीक गोष्टी खाण्यास मुलांचा हट्ट राहणार नाही.
वरील प्रकारे काळजी घेतल्यास हान मुलांना शक्यतो कधीही दातांच्या समस्या उद्भवणार नाहीत.
Comments