आपण व आपलेच डॉक्टर..
- OM Dental Satara
- Apr 18, 2021
- 2 min read
आज मावशी तिसऱ्यांदा सफाई करू गेल्या, माझ्यासमोरच..
तरी थोड्या वेळाने एक पेशंट म्हणाला , "कोपऱ्यात धूळ दिसतीये, तुमच्या मावशी नीट काम करत नाहीत."
पेशंटच्या समाधानासाठी मावशींना मी आणखी एकदा स्वच्छ करायला सांगितले..
मावशीचे डोळे पाणावले होते, ती थोडी चिडली ही होती .. कोरोनाच्या काळात जीव धोक्यात घालून , महिन्याच्या पगारासाठी, ती रोज दवाखान्यात कामाला येत होती..
हॉस्पिटल मधला प्रत्येक स्टाफ- रोज वेळेत येणे, व्यवस्थित काम कारणे, गरज पडेल तेव्हा एकजुटीने एकमेकांना सहाय्य कारणे, हे करत होते..
पण कोरोनापूर्वी , हॉस्पिटल मध्ये जेव्हा बेड्स उपलब्ध होते तेव्हा, याही पेक्षा जास्त स्वच्छ्ता असायची, स्पेशल रूम ची सोय होती, AC, TV असून सुद्धा एकदा एका पेशंटने एक "डास" दिसला म्हणून जो दंगा घातला होता.. मला अजूनही आठवतंय.. आम्हाला सर्वांना नचवलं होतं literally.. आणि रिव्ह्यू हा वेगळाच.. !
जीव ओतून काम केले तरी तेव्हा त्याची किंमत न्हवती..
पण आज एक बेड मिळेल का.. Plz काहीतरी करा .. म्हणून दिवसाला ५० फोन..
"Beds फुल आहेत, एक रूम रिकामी होईल थोड्यावेळाने.. पण त्या रूम मधल्या AC चा थोडा आवाज येत आहे.. , टीव्ही वर सर्व चॅनल दिसत नाहीत, रूम छोटी आहे, जेवण थोडं उशिरा येईल .. हो.. आणि हो.. मावशी फक्त तीन वेळा येतील.. चालेल का? .."
आहो डॉक्टर मी खाली गादी टाकून ऑक्सिजन घ्यायला पण तयार आहे !
आज जीव वाचवण्यासाठी लोक ३०० km लांब प्रवास करायला सुध्दा तयार आहेत .
पण हे सगळे काही दिवसच..
त्यानंतर.. पुन्हा आधी सारखेच सगळे होईल..
Beds उपलब्ध असताना सुध्दा, admit होणे गरजेचे आहे का?? सांगून सुध्दा , " काय गरज आहे admit होण्याची.. ? डॉक्टर नुसते पैसे काढतात, नुसत्या गोळ्या द्या, नाहीतर दुसरी कडे जाऊ! " असे म्हणणारे देखील आहेत.
गोळ्या दीलेल्याना, " गरज नसताना एवढ्या गोळ्या देतात डॉक्टर..! " म्हणणारे आज एका रेमदेसिविर साठी रंगाच्या रांगा लावत आहेत.."
आणि याहूनही पुढचे म्हणजे,
बहुतेक लोक आधी स्वतःच स्वतःवर उपचार करतात.. आणि ते उपचार जेव्हा fail होतात , तेव्हाच ते डॉक्टर कडे येतात..
उदाहरणार्थ,
जखमेवर हळद चोळणे,
लसूण लावांगा खाणे,
सर्व प्रकारचे काढे पिणे,
टीव्ही वरची सर्व औषधे try करणे,
रस्त्यावरचे शिळ्या तेलातले भजी, वडापाव चवीने खाऊन औषधाचे तर काही साईड इफेक्ट्स होणार नाहीत ना म्हणून डॉक्टरांना प्रश्न विचारून हैराण करणे.. (आणि काही लोक तंबाखू, गुटखा, सिगारेट व दारू पिऊन )
अगदी उशीर झाल्यावर, केस हाताबाहेर गेल्यावर ,
डॉक्टरांकडे जाणे..
आणि टेस्ट, स्कॅन सांगितले तर त्यांच्या नावाने बोंबलने,
वारंवार डॉक्टर बदलणे..
हे सर्व तर सर्रास चालू असते..
आणि "जीव" वाचल्यावर, बिलावरून भांडणे कारणे, ओळखी काढणे, अमुक तमुक बोलावणे, असे सुध्दा करतो आपण..!
सध्याच्या भयंकर परिस्थितीत तुमचे डॉक्टरच तुमच्या कामाला येणार आहेत..
जास्त काही नाही..
-जीव वाचवला म्हणून फक्त एकदा मनापासून thankyou म्हणा..
-Treatment व्यतिरिक्त कधीतरी सहज भेटा, फोन करा..
-त्यांच्यावर विश्वास ठेवा..
-जे पेशंट डॉक्टरांकडे श्रद्धेने येतात , त्यांच्यात इतरांपेक्षा फार लवकर improvement दिसुन येते.. हा माझा रोजचा अनुभव आहे!
या भयानक परिस्थितीत डॉक्टर्स युद्धभूमीवरील सैनिकाप्रमाणे , स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, स्वतःच्या कुटुंबाची रिस्क घेऊन आपले काम योग्य रीतीने बजावत आहेत.. त्यांना सहकार्य करा.. !
"कष्टाने उभं केलेलं आयुष्य, गोडीने जपलेला संसार,
चिमुकल्यांचं हसणं, जोडीदाराचं रागावणं,
थोरा मोठयांचे आशीर्वाद, कधी कारण होतं
म्हणून तर कधी विनाकारणच घातलेला वाद....
असूया, द्वेष, तिरस्कार, पैसा, मोह..
सगळं सगळं मागे टाकून
आज.. अचानक..
निघून चाललीत माणसं.." म्हणूनच जागे व्हा..
एकमेकास सहकार्य करा..
डॉ ऐश्वर्या मोरे, सातारा.
🍬